Posts Tagged ‘marathi’
नेहमीची येतो दुष्काळ (Draught is routine)
Posted by संदीप नारायण शेळके on February 28, 2013
ह्या सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर आहे:
Posted in Activity, Marathi, Politics in Agriculture, Thoughts | Tagged: Draught, Dushkal, marathi, water crisis | Leave a Comment »
Uddhav Thakare, please work for empowerment, freedom, opportunity.
Posted by संदीप नारायण शेळके on February 4, 2013

This is really sickness. They start demanding freebies whenever there is any disaster. But no contingency plan. No plan in place to empower farmers, to make them self dependent.
Lets stop this non sense once. Uddhav Thakare, I don’t support such naive demands. Every time demanding waivers, subsidies sound like beggar than self-respecting human. Where are the real demands for freedom, freedom of expression, freedom of movement, equal opportunity etc..
Jay Bharat!
Posted in Agriculture of Bharat, Bharat, Entrepreneurship, Marathi, Politics, Politics in Agriculture, Thoughts | Tagged: farmers issue, Freedom, how to solve crisis, marathi, thakare | Leave a Comment »
पंतप्रधानांसाठी जाहीर पत्र (रक्षकच बनले भक्षक)
Posted by संदीप नारायण शेळके on January 24, 2013
प्रती,
कॉंग्रेस प्रणीत केंद्र सरकार,
भारत.
मा. पंतप्रधान महोदय,
गेल्या काही वर्षांमधील घटना आणि त्यावर तुमच्या सरकारच्या आणि परिणामी तुमच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर असे दिसते कि तुम्हाला तुमच्या कामाचा विसर पडला आहे. त्या मुलभूत कामांची तुम्हाला आठवण करून देण्यासाठी, हा खटाटोप.
तुम्हाला ठरवून दिलेली मुख्य कामे:
१. नागरिकांचे व्यक्ती, संचार आणि व्यवसाय स्वातंत्र्य अबाधित राखणे
२. सर्वांना समान न्याय मिळवून देणे
३. अंतर्गत आणि बाह्य शत्रुंपासून जीवन आणि मालमत्तेची सुरक्षा करणे
४. समान संधी (त्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास) मिळवून देणे
ह्यासोबतच, प्रत्येक पै-न-पै चा हिशेब देणे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे.
वर ठरवून दिलेली कामे इमाने-इतबारे करण्याची शपथ घेतलेली असताना, खेदाची गोष्ट म्हणजे, तुम्ही ह्यातील एकही गोष्ट देऊ/पाळू शकला नाहीत. ह्याची नमुनादाखल खाली काही उदाहरणे दिली आहेत. क्रमशः
१. मागे एका व्यंग चित्रकाराने चित्र काढले म्हणून तुमच्याच कुठल्यातरी नियमानुसार त्याला अटक केली, अटक करणाऱ्यांवर काहीच कारवाई नाही.
२. महाराष्ट्र आणि आसाम मध्ये दुसऱ्या राज्यांमधून आलेल्या नागरिकांच्या जीवन आणि मालमत्तेचे नुकसान झाले, कोणावर काहीच कारवाई नाही.
३. समान न्याय दूरच राहिला परंतु देशाची संपत्ती लुटून भ्रष्टाचार करणाऱ्या तुमच्याच सहकाऱ्यांना साधे निलंबित सुद्धा केले नाही.
४. राजधानी सहित संपूर्ण देशभरात महिलांवरील अत्याचार, लुटमार आदींची परिसीमा झालेली असताना तुमच्याकडून काय पाऊल उचलले गेले? काहीच नाही याउलट, नको त्या विषयांवरून तुमच्या सहकाऱ्यांनी प्रसार माध्यमांमधून गदारोळ उठवून देशात अशांतंता निर्माण करण्याचे प्रयत्न केले.
५. सीमारेषा ओलांडून येउन काही दहशतवाद्यांनी देशाला वेठीस धरले, तुम्ही काय केले? तर त्या देशासोबत क्रिकेटच्या माध्यमातून चर्चा वाढवली.
६. एवढेच नाही तर त्या देशाने आपल्या सैनिकांना शांतंता रेषेजवळ अमानवीय रीतीने छळ करून मारले आणि एका सैनिकाचे शीर पळविले. तुमच्या सहकाऱ्यांनी देशप्रेमाच्या नावाखाली अतिरेक करू नका असे आम्हालाच सुनावले. एवढ्यावर न थांबता देशाला विरोधी पक्षापासून जास्त धोका आहे असे जाहीर प्रकटन करायला सुरुवात केली.
७. अशा परिस्थितीमध्ये गृहमंत्र्यांनी देशाची चिंता करायची सोडून बेछूट आणि बिन-बुडाचे युक्तिवाद सुरु केले कि ‘हिंदू दहशतवाद’ फोफावला आहे. खरच का? तसे असते तर ८०% हिंदू जनतेने जगभर हाहाकार माजवला असता. जगातील सर्वात सृजनशील आणि सहिष्णू समाजालाच दुषणे लावायला सुरुवात केली.
८. आम्हाला ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची भ्रांत असताना काही शहरांमधून पाण्याचा भल्या मोठ्या प्रमाणावर अपव्यय होताना दिसतो. तुम्ही काय पाऊले उचलली?
९. सर्वसाधारण गरीब जनतेला दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. तुम्ही काय केले? प्रत्येक वेळी एक नवीन योजना काढून भ्रष्टाचाराचे कुरण तयार केले. आणि नंतर रीतसरपणे विसरून जाता किंवा दुर्लक्ष करता.
१०. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला, हिशोब मागितला तर तुम्ही आम्हाला अटक करता नाही तर आयकर विभागाकडून तपासाचा ससेमिरा नाहक मागे लावता. असे डूख धरून सूड बुद्धीने काम करायला आणि भाऊ-बंधकी निभवायला तुमची निवड केलीय का?
११. एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या विरोधी बाजू घेतली; म्हणून, तुमच्याच कोण्या एका सहकाऱ्याने पोलिसांकडून त्या वकिलाच्या भावाला शनिवारी मध्यरात्री अटक केली आणि तुरुंगात बेदम मारहाण केली.
एवढे सगळे झाल्यावर, इतक्या सगळ्या चुका केल्यावर तुम्हाला हे काम करण्याची अजूनही संधी का द्यावी? संविधान आणि नागरिकाच्या सार्वभौमत्त्वाचा अनादर केला म्हणून तुमच्यावर अविश्वास ठराव का ठेवू नये?
आणि हो हे पत्र वाचल्यावर हा कोण, मला माझे काम सांगणारा? असा विचार चुकुनही करू नका कारण, मी, तुमचा मालक, ह्या देशाचा सार्वभौम नागरिक आहे.
जय भारत!
- एक जागसुक नागरिक.
Posted in Bharat, Thoughts, Politics, Marathi | Tagged: Letter to prime minister, marathi, reminder of importance of republic of Bharat, Sovereign citizen | Leave a Comment »
मराठी विषयी माहिती
Posted by संदीप नारायण शेळके on August 30, 2011
१. पूर्वी अफ़गाणिस्तान ते कन्याकुमारी व बडॊदा ते बंगाल असे मराठी राज्य पसरले होते.
२. मराठी राजा छ. शिवाजी महाराजांनीच देशातील परकीय राजवटीला छेद दिला आणि दिल्लीवर मराठी माणसाचा दबदबा निर्माण केला.
३. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई नेवाळकर यांनी हिंदीत नव्हेतर मराठीतच ”मी माझी झाशी देणार नाही” असे म्हटले आहे. तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाई यांनी १८५७ च्या उठावात मोलाची भूमिका बजावली.
४. देशात स्त्रियांच्या शिक्षणासाठी पहिली चळवळ महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनीच उभा केली.
५. महात्मा फुल्यांपासून ते अण्णा हजारेंपर्यंत मराठी समाज सुधारकांनी वेळप्रसंगी प्राणांची तमा न बाळगता देशासाठी सर्वस्व अर्पण केले.
६. महाराष्ट्राच्या उभारणीसाठी १०५ मराठी बांधवांनी हौतात्म्य पत्करले.
७. देशाच्या आर्थिक उत्पन्नातील सर्वाधिक वाटा महाराष्ट्राचा आहे.
८. सांगली व कोल्हापूरमधील मराठी माणसांचे चांदी शुद्ध करण्याचे कारखाने भारतातील महत्वांच्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांचा या व्यवसायात फ़ार मोठा वाटा आहे.
९. मराठी साहित्य संमेलने १०० वर्षांहून अधिक काळापासून अखंड सुरु आहेत हाही एक विक्रमाच आहे. (कन्नड आणि उर्दू याही भाषांची साहित्य संमेलने होतात पण ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रचलित नाहीत.)
१०. कराचीत(पाकिस्तान) नारायण जगन्नाथ विद्यालय मराठी शाळा असून इथले विद्यार्थी गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होतात.
११. रशिया, ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये ४४ मराठी रेडीओकेंद्रे आहेत.
१२. मराठी भाषेत ४८ पेक्षा जास्त साहित्यप्रकार आहेत आणि १३० पेक्षा जास्त कलाप्रकार असून हा एक जागतिक विक्रम आहे. संगणकावर कंट्रोल पॅनेलमध्ये लोकेशन इंडीया केले तर सर्व कामे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये सहज करता येतात.
१३. मराठी फक्त महाराष्ट्रातच नाही तर गोवा, दिऊ-दमन, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगढ, दादरा नगर हवेली इ. मधेही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते.
१४. मराठी हि दिऊ-दमन, दादरा नगर हवेली, गोवा ह्या इतर प्रदेशांमधेही सह-राज भाषा म्हणून मान्य आहे.
१५. मराठी मध्ये ४२ हून अधिक पोटभाषा आहेत.
१६. मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या देशात ४ थ्या तर जगात १५ व्या क्रमांकाची आहे.
जय महाराष्ट्र! जय भारत!
Posted in History, Language, Marathi, Politics | Tagged: मराठी, Incredible Marathi, marathi, Marathi Asmita, Marathi Vishayi Mahiti, Marathicha Mahima, Rani Lakshmibai, Shivaji Maharaj, Tatya Tope | Leave a Comment »
निसतच म्हणतो धरणी माय
Posted by संदीप नारायण शेळके on April 4, 2011

अरं धरणी मातेचं रडनं अन दुखनं समजून घे मेरे भाय ।
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय ॥
दिसल ती जमीन कसून घेतो रस समदा शोषून घेतो ।
माय मरू दे, माय मरू दे, फायद्याची सामाद्यांनाच झाली घाय ॥
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय ॥

कारखान्याच्या चिमणीतून काळा धूर भस्सा भस्सा वरतून समदं पेटत चाललंय खालून पाण्याचा उपसा ।
वर्षाची बारा महिनं कडक उन्हात जाय ॥
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय ॥
ग्लोबल वार्मिंग वाले म्हणत्यात हळू जरा धीर आम्हाला काहीच ऐकू येत नाही कान आमचे बधीर ।
अरं तापत चालायचं धरणी मायाच डोक, छाती, पोट अन पाय ॥

निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय ॥
असंच चालू राहिलं तर आपली काय खैर नाय उद्या चालून आपलं पोरगं विचारल “बाबा बाबा हिरवळ म्हंजी काय” ।
अरं उठ, अरं उठ वाचवं आपल्या आईला झटकून हात अन पाय ॥
निसतच म्हणतो धरणी माय पण तिच्यासाठी करतो काय ॥
स्रोत: हुप्पा हुय्या
जय भारत!
Posted in Agriculture of Bharat, Farmer's Suicides, Indian Agriculture, Language, Marathi, Politics in Agriculture, World Affairs | Tagged: Climate change, Environment, exploitation of agriculture, global warming, huppa huiya, huppa huyya, marathi | Leave a Comment »






