Krishi Desh

For Bharat and Bharati

Archive for the ‘Marathi’ Category

Marathi posts.

काही निवडक रचना ई-पुस्तिका म्हणून प्रकाशित

Posted by संदीप नारायण शेळके on February 9, 2014


माझ्या आजपर्यंतच्या काही निवडक रचना ज्यांना मी कविता समजतो त्या संकलित करून ई-पुस्तिका म्हणून प्रकाशित केले आहे.

तुमची प्रत डोउनलोड  करा.

- संदीप शेळके

Posted in Marathi, Poem | Tagged: , , | Leave a Comment »

ब्रिटीश वसाहत सत्ताधीकाराकडून संविधान मार्गे सार्वभौमत्वाकडे, अरविंद केजरीवाल यांच्या माहितीसाठी

Posted by संदीप नारायण शेळके on January 26, 2014


आज, २६ जानेवारी २०१४ रविवार, दिनी भारत देश ६४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहे. आजवर बऱ्याच वेळा भारतीय संविधान उलथून टाकून अराजक माजविण्याचा प्रयत्न काही महाभागांनी केला, जसे इंदिरा गांधी, राजीव गांधी, अरविंद केजरीवाल, जात पंचायती, काही प्रसार माध्यमे इ. परंतु प्रत्येक वेळी भारतीयांनी प्रजासत्ताक टिकविण्यासाठी संविधानाच्या बाजूने लढा दिला आणि मला अभिमान आहे. जय भारत!

ब्रिटीश शासकांकडून राष्ट्रकुल देशांतर्गत भारताला सत्ताधिकार प्राप्त झाला आणि १५ आगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. अधिकृतरीत्या ब्रिटीश साम्राज्यात भारताला सत्ताधिकार म्हणजेच स्वतःचे लोक राज्यकर्ते म्हणून निवडण्याचा अधिकार मिळाला. हे लक्षात घेणे महत्त्वाचे राहील कि आपल्याला केवळ सत्ताधिकार मिळाला सार्वभौमत्व नाही. म्हणजेच राजकीय स्वातंत्र्य मिळाले परंतु भारताची निष्ठा, कागदोपत्री, ब्रिटीश राणी चरणीच राहणार होती. आणि तशी ती १५ आगस्ट १९४७ ते २६ जानेवारी १९५० दरम्यान राहिली, अर्थातच ह्यादर्म्यान ब्रिटीश राणीच आपल्यासाठी सर्वस्व होती, (किळसवाणे वाटते ना?).

सार्वभौमत्व मिळविण्यासाठी भारताला स्वतःचे संविधान असणे बंधनकारक तसेच सर्वाच्च गरजेचे होते. आदरणीय बाबासाहेब (डॉ. भीमराव रामजी आंबेडकर) ह्यांच्या नेत्तृत्त्वाखाली २६ आगस्ट १९४७ दिनी सभागृहामध्ये संविधान समितीची स्थापना करण्यात आली.

संविधान:

स्थापन केल्यापासून केवळ ६६ दिवसांमध्ये अहोरात्र काम करून बाबासाहेबांनी ४ नोवेंबर १९४७ दिनी संविधान समितीने प्रथम आराखडा सभागृहापुढे सादर केला. तद्नंतर २ वर्षांच्या काळात अनेक चर्चांअंती जवळपास २००० बदल, सूचना स्वीकारून संविधानाला अंतिम स्वरूप प्राप्त झाले. सभागृहाने ह्यासाठी १६६ दिवस अथक चर्चा केल्या आणि २४ जानेवारी १९५० दिनी सभागृहाच्या ३०८ सदस्यांनी हिंदी आणि इंग्रजी अशा दोन संविधानाच्या प्रतींवर स्वाक्षरी करून मान्यता नोंदविली. शेवटी २६ जानेवारी १९५० दिनी सभागृहाने संविधान स्वीकारले आणि आपण म्हणजेच भारत देश सार्वभौम झाला.

जगातील सर्व सार्वभौम देशांच्या लिखित स्वरूपातील संविधानात भारतीय संविधान सर्वात लांब आहे. त्यामध्ये १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ नियम/कलम, ५ परिशिष्ठ आणि ९८ घटनादुरुस्ती आहेत. माझ्यासाठी एकच खेदाची गोष्ट आहे ती म्हणजे भारतातील सर्व भाषांमधील घटना आजतागायत संसदेने स्वीकारलेली नाही. तरीही सध्याच्या घटनेचे महत्व कमी होत नाही.

सत्ताधीकाराकडून सार्वभौमत्वाकडे

सत्ताधीकाराकडून सार्वभौमत्वाकडे

मला खात्री आहे कि दिल्लीच्या मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांना संविधानाच्या ह्या प्रवासाचे आणि स्वरूपाचे संपूर्ण ज्ञान आहे. आणि जर नसेल तर कृपया संविधानाचे महत्व अधोरेखित करणाऱ्या ह्या लेखाकडे जर लक्ष द्या.

भारताने सार्वभौमत्त्व प्राप्त करण्यासाठी संविधानाचा आराखडा तयार करण्यापासून ते स्वीकारण्यापर्यंत रु १० कोटी खर्च केले आणि देशाचा बहुमुल्य वेळ सुद्धा. ह्या संविधानामुळे देशातील कुठलेही सरकार हे जनतेचे सेवक झाले (वस्तुस्थितीमध्ये असे नसले तरी तो आपला दोष आहे संविधानाचा नाही) जे जनतेच्या आणि त्यांच्या अधिकारांच्या सुरक्षेसाठी बाध्य आहे. त्यामुळेच जनता प्रशासन चालविण्यासाठी दर ५ वर्षांनी सरकार निवडते.
– हो हे सत्य आहे कि समाजवादी मानसिकतेच्या रोगाने पछाडलेल्या राजकारण्यांनी भ्रष्ट पद्धतीने भावनिक मुद्यांचे राजकारण करून मतांचा मलिदा खाल्ला.
– आपल्याला भ्रष्टाचार आणि अराजकतेविरुद्ध लढावे लागणार आहे त्यासाठी संविधान दोषी नाही, योग्य मुद्यांसाठी आपण घटनादुरुस्ती करू शकतो.
– नागरिकांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारे कलमं आपल्याला दुरुस्त करावे लागणार आहेत.
– आपल्याला ते सर्व कलमं बदलावे लागतील जे नागरिकांना जात, पंथ, वर्ण, लिंग आदि बाबींवर विभागत आहेत.
– हो अशा काही घटनादुरुस्ती झाल्या त्या नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर तसेच संघराज्यीय स्वरूपा विरोधात आहेत (जसे ४२ वि आणि ९८ वि घटनादुरुस्ती).

परंतु आपण हे कदापि विसरत कामा नये:
– संविधानामुळे गुलामीची वाट लागली.
– भारतासाठी संविधान सर्वोच्च आहे.
– संविधान भारतासाठी जगण्याची दिशा आहे, आत्मा आहे.

जय भारत!

READ IN ENGLISH British Dominion to Republic via Constitution, FYI Mr Arvind Kejriwal

Posted in Bharat, History, Marathi, Politics, Thoughts | Tagged: , , , , , , | 1 Comment »

गुलामी

Posted by संदीप नारायण शेळके on January 19, 2014


मोफत मिळविणे फुकटचे खाणे,
ह्याने तू नाही उरणार तुझा
हिसकावून घेतील स्वातंत्र्य तुझे,
नाही थांबलास तर गुलाम होशील त्याचा

जर पात्रतेहून अधिक मिळत असेल तुजला,
चंगळ अन माज मिरवतील जीवावर तुझ्या,
आरोग्य खालावेल मानसिक आणि शारीरिक,
वाढेल अहं आणि गुलाम होशील तयांचा

प्रेम कोणी केले तर अधिकार नाही तो तुझा,
त्या क्षणी तो केवळ प्रेम देणारा वाटसरू,
आता प्रेम करण्याचे कर्म तुझे,
फळ मागशील तर गुलाम होशील त्याचा

स्पर्धा नसून, जीवन आहे जगायला,
अर्थ नसतोच मुळी आयुष्याला,
तो शोधायचा असतो स्वतःला,
जर पाहशील जय-पराजय तर गुलाम होशील तयांचा

 

- संदीप शेळके

Posted in Marathi, Philosophy, Poem | Tagged: , | Leave a Comment »

जिथे मन भयमुक्त आहे आणि माथा उंचावलेला आहे

Posted by संदीप नारायण शेळके on January 11, 2014


चित्त जिथे भयमुक्त आहे,

माथा जिथे उंच आहे,

ज्ञान जिथे मुक्त आहे,

जिथे दिवस रात्री ह्या धरेला आपल्या क्षुद्र हेतूंनी विभागले जात नाही

प्रत्येक वाक्य जिथे हृदयापासून निघते,

कर्माचे अजस्त्र स्रोत दाही दिशांमधून फुटून अबाधितपणे वाहत आहेत,

जिथे शुद्ध विचारांची सरिता तुच्छ रुढींच्या वाळवंटात हरवली नाही,

जिथे पुरुषार्थ शेकडो तुकड्यांमध्ये विभागाला नाही,

जिथे कर्म, भावना, आणि आनंदानुभूती तुझ्यामुळे आहे,

हे तात, आपल्या हातांनी निर्दयीपणे आघात करून,

अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात ह्या निद्रिस्थ भारतास जागव.

- रवींद्रनाथ ठाकूर

उल्लेख:
Chitto jetha Bhayashunyo
गीतांजली रविंद्रनाथांची माझ्या मराठीत – सौ ज्योती कुलकर्णी

 

Posted in Marathi, Poem | Tagged: , , , | Leave a Comment »

विश्वाची चिंता मज सतावते

Posted by संदीप नारायण शेळके on January 5, 2014


कोण जाने का घरोघरी दुखः नांदते
न जाणे का विश्वाची चिंता मज सतावते

क्षणभंगुर आयुष्याची चटक एवढी लागते
सत्याचे रूपक मृत्यू शत्रू सम भासते

का केली बापुड्या घाई जगण्याची
निदान तारुण्य तरी उरकायचे सावकाश

प्रेम आणि सुखाच्या आमिषाने मनाचे झाले पायपुसणे
कसले प्रेम नि कसले सुख
आता घर आहे कधी धुराचे, कधी सुराचे तर कधी मयाचे

जिंकण्याची ओढ नव्हती मला कधीच
पण मला कळायच्या आधीच स्पर्धेने मला ओढले

– संदीप

Posted in Marathi, Poem, Thoughts | Tagged: , | Leave a Comment »

पाण्याचा दुख:काळ का पडतो? तुटवडा का निर्माण होतो?

Posted by संदीप नारायण शेळके on April 11, 2013


ह्या प्रश्नावर मी गेली कित्येक दिवस विचार करीत आहे. आणि त्यातून मला समजलेली काही कारणे. निश्चितच मी इथे जी करणे नमूद केली आहेत त्यामध्ये अजून सुधारणा होऊ शकतात.

गैरवापर:

 • बेहिशोबी आणि बेजबाबदार पिक व्यवस्थापन

 • नदी पात्रांमधील, ओढे-नाल्यावरील अतिक्रमण

 • बेसुमार वाळू उपसा आणि तस्करी.

 • अवैध जंगलतोड

 • वाढते प्रदूषण

 • बंधारे आणि जलाशयांचा बेसुमार आणि अनिर्बंध वापर

 • जमिनीखालील पाण्याचा बेसुमार उपसा

नियोजनाचा अभाव:

 • पावसाच्या पाण्याचे ढिसाळ नियोजन आणि संधारणाविषयीची उदासीनता

 • शेतामधील नष्ट होणारे बांध आणि त्यामुळे नाश पावणारी वनराई

 • सुमार वृक्ष लागवड व संवर्धनाच्या नावाने असणारी बोम्ब

 • अनियमित आणि अनिर्बंध शहरीकरण

 • वाढत्या कुपनलिका/ट्यूबवेल/बोअरवेल

दुर्लक्ष:

 • पाण्याच्या वाहतुकीमध्ये होणारी गळती

 • दुषित पाणी, मल विना प्रक्रिया नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडणे

 • मोठाले धरणं बांधून पाण्याच्या जाणीवपूर्वक वापराकडे होत असलेले दुर्लक्ष

 • सूक्ष्म आणि मध्यम जलाशयांकडे होत असलेले अघोरी दुर्लक्ष

 • जमिनीखालील पाण्याची पातळी वाढविण्याकडे होत असलेले दुर्लक्ष

परंतु अजून खोल विचार केल्यावर लक्षात आले कि हि तर फक्त लक्षणं आहेत खरे कारण तर “नेत्तृत्त्वाचा अभाव आणि स्वधर्माचा पडलेला विसर” आहे.

जय भारत!

Posted in Agriculture of Bharat, Marathi, Thoughts | Tagged: , | Leave a Comment »

नेहमीची येतो दुष्काळ (Draught is routine)

Posted by संदीप नारायण शेळके on February 28, 2013


“नेहमीची येतो पावसाळा” तसे आता “नेहमीची येतो दुष्काळ” असे म्हणायची वेळ आली आहे.

दर ३-४ वर्षांनी एक लहानसा दुष्काळ आणि दर १०-१२ वर्षांनी एक भयावह दुष्काळ, हे असे दुष्टचक्र प्रस्थापित होत आहे. बरं, अशा वेळी सरकार, विरोधक अथवा अन्य कोणाला दोष देऊन उपयोग होत नाही. कारण पाण्याची कमतरता भरून काढणे खिशातून नोटा काढण्याएवढे सोपे नाही. अर्थातच सरकारी दूरदृष्टीचा आणि आत्मीयतेचा अभाव हि गंभीर बाब आहे. परंतु ह्यामध्ये जनतेची, म्हणजेच आपली, काहीच चूक नाही का?

सोपे उदाहरण घ्या,

पूर्वी प्रत्येक शेताला मोठाल्या ताली घातलेल्या असायच्या. आता कुठे आहेत. १ फुटाचा बांध सुद्धा नको वाटतो. अजून बघायचे झाले तर बांधावरील झाडे. संपूर्णपणे गायब झाले आहेत. का? का तर त्यामुळे शेतात ओसावा पडतो. किती क्षेत्र? अगदी नगण्य असे. परंतु असा दुष्काळ पडल्यावर किती क्षेत्र रिकामे पडते? गावांची अवस्था मसनवटयापेक्षा भयानक आहे. रस्त्याच्या कडेला झाडे नाहीत, त्यामुळे पावसाने पडणारे पाणी वाहून तर जातेच पण सोबतच मातीही जाते. शेतांची अवस्था काही वेगळी नाही.

बरं आमच्यासारखा काही बोलला तर त्याला सरळ सुनावले जाते “तुम्हाला काय कळते त्यातले. आमचे अवघे आयुष्य गेले ह्याच्यात. पावसापुढे कोणाचे काही चालत नाही. सरकारने धरणाचे पाणी दिले पाहिजे.”

ह्या सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर आहे:
प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव व्हायला पाहिजे.

सरकारने नक्कीच सकारात्मक भूमिका घ्यायला पाहिजे परंतु नागरिकांचा त्याला प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे.

जय भारत!

Posted in Activity, Marathi, Politics in Agriculture, Thoughts | Tagged: , , , | 4 Comments »

शिवाजी – सेर सिवराज है

Posted by संदीप नारायण शेळके on February 20, 2013


“छत्रपति शिवाजी महाराज”

इंद्र जिमी जम्भ पर बाड्व सुअम्ब परShivaji Maharaj
रावण सदम्भ पर रघुकुलराज है ||१||
पौन बरिवाह पर | संभु रतिनाह पर |
ज्यो सहसबाह पर | राम द्विजराज है ||२||
दावा द्रुम दंड पर | चिता मृग झुंड पर |
भूषण बितुंड पर | जैसे मृगराज है ||३||
तेजतमअंस पर | कान्ह जिमी कंस पर |
त्यों म्लेंछ बंस पर| सेर सिवराज है ||४||
-कविराज भूषण

जय भारत!

स्रोत श्री नितीन बानगुडे पाटील

Posted in Marathi, Poem, Shivaji Maharaj | Tagged: , , , , , , | Leave a Comment »

Uddhav Thakare, please work for empowerment, freedom, opportunity.

Posted by संदीप नारायण शेळके on February 4, 2013


image

This is really sickness. They start demanding freebies whenever there is any disaster. But no contingency plan. No plan in place to empower farmers, to make them self dependent.

Lets stop this non sense once. Uddhav Thakare, I don’t support such naive demands. Every time demanding waivers, subsidies sound like beggar than self-respecting human. Where are the real demands for freedom, freedom of expression, freedom of movement, equal opportunity etc..

Jay Bharat!

Posted in Agriculture of Bharat, Bharat, Entrepreneurship, Marathi, Politics, Politics in Agriculture, Thoughts | Tagged: , , , , | Leave a Comment »

पंतप्रधानांसाठी जाहीर पत्र (रक्षकच बनले भक्षक)

Posted by संदीप नारायण शेळके on January 24, 2013


Read in English

प्रती,
कॉंग्रेस प्रणीत केंद्र सरकार,
भारत.

मा. पंतप्रधान महोदय,

गेल्या काही वर्षांमधील घटना आणि त्यावर तुमच्या सरकारच्या आणि परिणामी तुमच्या प्रतिक्रिया पाहिल्यावर असे दिसते कि तुम्हाला तुमच्या कामाचा विसर पडला आहे. त्या मुलभूत कामांची तुम्हाला आठवण करून देण्यासाठी, हा खटाटोप.

तुम्हाला ठरवून दिलेली मुख्य कामे:
१. नागरिकांचे व्यक्ती, संचार आणि व्यवसाय स्वातंत्र्य अबाधित राखणे
२. सर्वांना समान न्याय मिळवून देणे
३. अंतर्गत आणि बाह्य शत्रुंपासून जीवन आणि मालमत्तेची सुरक्षा करणे
४. समान संधी (त्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास) मिळवून देणे
ह्यासोबतच, प्रत्येक पै-न-पै चा हिशेब देणे आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे.

वर ठरवून दिलेली कामे इमाने-इतबारे करण्याची शपथ घेतलेली असताना, खेदाची गोष्ट म्हणजे, तुम्ही ह्यातील एकही गोष्ट देऊ/पाळू शकला नाहीत. ह्याची नमुनादाखल खाली काही उदाहरणे दिली आहेत. क्रमशः

१. मागे एका व्यंग चित्रकाराने चित्र काढले म्हणून तुमच्याच कुठल्यातरी नियमानुसार त्याला अटक केली, अटक करणाऱ्यांवर काहीच कारवाई नाही.
२. महाराष्ट्र आणि आसाम मध्ये दुसऱ्या राज्यांमधून आलेल्या नागरिकांच्या जीवन आणि मालमत्तेचे नुकसान झाले, कोणावर काहीच कारवाई नाही.
३. समान न्याय दूरच राहिला परंतु देशाची संपत्ती लुटून भ्रष्टाचार करणाऱ्या तुमच्याच सहकाऱ्यांना साधे निलंबित सुद्धा केले नाही.
४. राजधानी सहित संपूर्ण देशभरात महिलांवरील अत्याचार, लुटमार आदींची परिसीमा झालेली असताना तुमच्याकडून काय पाऊल उचलले गेले? काहीच नाही याउलट, नको त्या विषयांवरून तुमच्या सहकाऱ्यांनी प्रसार माध्यमांमधून गदारोळ उठवून देशात अशांतंता निर्माण करण्याचे प्रयत्न केले.
५. सीमारेषा ओलांडून येउन काही दहशतवाद्यांनी देशाला वेठीस धरले, तुम्ही काय केले? तर त्या देशासोबत क्रिकेटच्या माध्यमातून चर्चा वाढवली.
६. एवढेच नाही तर त्या देशाने आपल्या सैनिकांना शांतंता रेषेजवळ अमानवीय रीतीने छळ करून मारले आणि एका सैनिकाचे शीर पळविले. तुमच्या सहकाऱ्यांनी देशप्रेमाच्या नावाखाली अतिरेक करू नका असे आम्हालाच सुनावले. एवढ्यावर न थांबता देशाला विरोधी पक्षापासून जास्त धोका आहे असे जाहीर प्रकटन करायला सुरुवात केली.
७. अशा परिस्थितीमध्ये गृहमंत्र्यांनी देशाची चिंता करायची सोडून बेछूट आणि बिन-बुडाचे युक्तिवाद सुरु केले कि ‘हिंदू दहशतवाद’ फोफावला आहे. खरच का? तसे असते तर ८०% हिंदू जनतेने जगभर हाहाकार माजवला असता. जगातील सर्वात सृजनशील आणि सहिष्णू समाजालाच दुषणे लावायला सुरुवात केली.
८. आम्हाला ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची भ्रांत असताना काही शहरांमधून पाण्याचा भल्या मोठ्या प्रमाणावर अपव्यय होताना दिसतो. तुम्ही काय पाऊले उचलली?
९. सर्वसाधारण गरीब जनतेला दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. तुम्ही काय केले? प्रत्येक वेळी एक नवीन योजना काढून भ्रष्टाचाराचे कुरण तयार केले. आणि नंतर रीतसरपणे विसरून जाता किंवा दुर्लक्ष करता.
१०. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला, हिशोब मागितला तर तुम्ही आम्हाला अटक करता नाही तर आयकर विभागाकडून तपासाचा ससेमिरा नाहक मागे लावता. असे डूख धरून सूड बुद्धीने काम करायला आणि भाऊ-बंधकी निभवायला तुमची निवड केलीय का?
११. एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सरकारच्या विरोधी बाजू घेतली; म्हणून, तुमच्याच कोण्या एका सहकाऱ्याने पोलिसांकडून त्या वकिलाच्या भावाला शनिवारी मध्यरात्री अटक केली आणि तुरुंगात बेदम मारहाण केली.

एवढे सगळे झाल्यावर, इतक्या सगळ्या चुका केल्यावर तुम्हाला हे काम करण्याची अजूनही संधी का द्यावी? संविधान आणि नागरिकाच्या सार्वभौमत्त्वाचा अनादर केला म्हणून तुमच्यावर अविश्वास ठराव का ठेवू नये?

आणि हो हे पत्र वाचल्यावर हा कोण, मला माझे काम सांगणारा? असा विचार चुकुनही करू नका कारण, मी, तुमचा मालक, ह्या देशाचा सार्वभौम नागरिक आहे.

जय भारत!
– एक जागसुक नागरिक.

Posted in Bharat, Marathi, Politics, Thoughts | Tagged: , , , | Leave a Comment »

 
Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 472 other followers

%d bloggers like this: