प्रिय भारतीय,
भारतीय स्वतंत्रता संघ (FTI) संपूर्ण भारतीय स्तरावर धोरण लिखाण स्पर्धा नियोजित करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला रु. ५ लाखांचा निधी जमा करायचा आहे, पैकी जवळपास रु.९५,००० (अधिकतर) FTI सदस्यांमार्फत गेल्या ३ दिवसांत जमा झाला आहेत.
प्रस्तावित स्पर्धेसाठी निधी विषयीची सविस्तर माहिती जाहीर केली आहे. कृपया पुढील दुव्यावर भेट द्या: http://freedomteam.in/blog/content/request-to-fund-indias-first-ever-all-india-policy-writing-competition
या टप्प्यावर आम्ही आपल्याकडून केवळ वचन मागत आहोत, आम्हाला पैसा लगेच नको आहे तो फक्त स्पर्धा निश्चित झाल्यावर पारितोषिकाची रक्कम देण्यासाठी लागेल.
आम्ही तुम्हाला या लहानशा उपक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आमंत्रित करीत आहोत. FTI लोकशाहीची राजधानी निर्मितीसाठी वचनबद्ध आहे. आम्हाला असे वाटत नाही कि कुठल्याही एका व्यक्तीने रु.३०,००० हून अधिक निधीचे सहकार्य करू नये. हे एका नव्या, वेगळ्या भारताच्या प्रतीनिधीत्त्वाविषयी, मालकीविषयी आहे. जर तुम्ही कुठल्याही मूल्याचे सहकार्य करू इच्छित असाल तर मला जरूर कळवावे.
कृपया हि माहिती तुमच्या सहकारी, मित्र-परिवाराला न चुकता कळविणे.
जय भारत!






