छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विषयीचे सत्य
Posted by संदीप नारायण शेळके on February 18, 2012
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना सप्रेम नमस्कार.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीवरून अनेक वर्षांपासून काही लोक जाणीवपूर्वक घोळ घालत आहेत. त्यांचे म्हणणे आहे कि छ शिवाजी महाराजांचा जन्म “फाल्गुन वद्य ३, शके १५५१ ” म्हणजेच “१९ फेब्रुवारी १६३०” साली झाला आणि हे ०३ फेब्रुवारी २००० साली आघाडी सरकारने मान्य केले. विशेष म्हणजे ह्या तिथी साठी कुठलाही ठोस पुरावा अद्याप उपलब्द्ध नाही (इथुनपुढे निर्माण केला जाऊ शकतो). त्याच्यावर ज्या युती शासनाने विधानसभेत ठराव मांडला होता आणि “१९ फेब्रुवारी १६३०” साठी रेटा लावला होता त्यांनी लगेचच घुमजाव करीत तिथीप्रमाणे जयंती साजरी करण्याचा कांगावा सुरु केला. दुसरीकडे अगदी १९९९ पर्यंत छ शिवाजी महाराजांची जयंती “वैशाख शुद्ध ३ – अक्षयतृतीया-, शके १५४९” म्हणजेच ०८ एप्रिल १६२७ अशीच साजरी केली जात असे आणि तसे ठोस पुरावेसुद्धा उपलब्ध आहेत.
आता मला खात्रीनुसार शिवाजी महाराजांच्या जन्म तिथीविषयी काहीही शंका वाटत नाही कारण मी श्री अनंत दारवटकरांनी लिहिलेले “अद्वितीय छ. संभाजी महाराज” ह्या पुस्तकातील शिवजन्मतिथी विषयीचे अभ्यासपूर्ण लिखाण वाचले आणि त्याने माझे डोळे लख्ख उघडले.
खालील सर्व माहिती मी श्री. अनंत दारवटकरांनी लिहिलेले “अद्वितीय छ. संभाजी महाराज” ह्या पुस्तकातून घेतली आहे:
१. सुर्यवंश (शिवभारत): ह्या ग्रंथातील श्लोक २६ ते ३१ नुसार छ शिवाजी महाराजांचा जन्म “वैशाख शुद्ध ३ – अक्षय तृतीया -, शके १५४९” म्हणजेच ०८ एप्रिल १६२७ साली झाला आहे.
२. शिवदिग्विजय: ह्या ग्रंथातील ३ श्लोक छ शिवाजी महाराजांचा जन्म “प्रभव संवत्सर, शके १५४९, वैशाख शुद्ध ३, रोहिणी नक्षत्र, रविवार, सूर्योदय” ह्या तिथीचाच असल्याची माहिती नमूद करतात.
३. १२ बखरी: जवळपास बाराच्या बारा बखरी छ शिवाजी महाराजांचा जन्म “प्रभव संवत्सर, शके १५४९” असल्याचे नमूद करतात, तर त्यातील ९ बखरी “वैशाख शुक्ल” असल्याचे नमूद करतात. एकूण पाहता ९ बखरी “प्रभव संवत्सर, शके १५४९, वैशाख शुद्ध २(३, ४, ५)” अशी तिथी नमूद करतात.
वरील पुराव्यांकडे बारकाईने पाहिल्यास आढळते कि सुर्यवंश(शिवभारत) आणि शिवदिग्विजय ह्या, निर्विवाद छ शिवाजी महाराजांच्या समकालीन, ग्रंथांमध्ये त्यांच्या जन्मतिथीविषयी एकवाक्यता आहे. आणि बखरकारांनी दिलेली माहिती हि सर्वसाधारणपणे दोन्हीही ग्रंथांमधील माहितीशी सुसंगत आहे. म्हणून छ शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी १६३० न मानता ०८ एप्रिल १६२७ हीच मानावी आणि मोठ्या उत्साहाने त्यांच्या चरित्रकथा गात साजरी करावी.
पण ह्या सर्व जयंतीच्या वादामध्ये मुख्य प्रश्न आहे कि हा वाद का निर्माण केला? कोणी निर्माण केला? आणि कधी पासून निर्माण केला? ह्या सर्व प्रश्नांना उत्तर शोधण्याचे प्रयत्न श्री अनंत दारवटकरांनी “अद्वितीय छ. संभाजी महाराज” ह्या पुस्तकामधून केला आहे. कृपया सर्वांनी, विशेषतः इतिहास प्रेमींनी, श्री अनंत दारवटकरांनी लिहिलेले “अद्वितीय छ. संभाजी महाराज” ह्या पुस्तकांचे सर्व खंड वाचावेत.
जय भवानी ! जय शिवाजी !
जय भारत!
18.649240
73.765628
Like this:
Like Loading...
This entry was posted on February 18, 2012 at 5:30 pm and is filed under Bharat, History, Politics, Shivaji Maharaj.
Tagged: 08 April 1627, Advitiy Chhatrapati Sambhaji Maharaj, Anant Daravatkar, Chhatrapati Shivaji Maharaj, Shiv Jayanti, Shivaji Maharaj. You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed.
You can leave a response, or trackback from your own site.
NITIN MANAJI said
BUT NOW A DAY D BIRTH DATE IS NOT MENTION BY U THATS R DIFFER AND LOKMANY TILAK DATE OF BIRTHS IS A DIFFER THEN WHAT IS D REAL DATE Y D GOVERMENT TRY TO CONFUSE D DATE ISSUE ????
संदीप नारायण शेळके said
Nitin Namaste,
Its not govt who is creating confusion. Its a team of anti-social and anti-Shivaji (you can read anti-Bahujan) who form a cotterie of so called intellectuals. They seems to have clear agenda of maligning character of Shivaji Maharaj’s parents. They have already maligned character of Sambhaji. So through this evil move it would be proved that Chhatrapati was groomed by Brahmin Guru and there is no family geniusness/braveness.
But fortunately Bahujan samaj is not sleeping and many writers, historians are doing excellent job.
More powers to them.
Jai Bhavani! Jai Shivaji!
PRAVIN NETKE said
!!छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विषयीचे सत्य!!
सर्व लिखाण वाचले आणि माझे डोळे उघडले. शिवाजी महाराजांच्या जन्म तिथीविषयी काहीही शंका वाटत नाही.
जय भवानी ! जय शिवाजी !
prasad p gadre said
daute gehnara shive sainik nastocha